नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या लाटेने रौद्र रुप धारण केले असून गेल्या २४ तासांत जवळजवळ अ़डीच लाख नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. हा आकडा काल सापडलेल्या रुग्णांपेक्षा २७ टक्क्यांनी जास्त आहे. याशिवाय ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येतही वाढ सुरूच आहे.
मागील २४ तासांमध्ये देशभरात २ लाख ४७ हजार ४१७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच, ३८० कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याचे देखील समोर आले असून, आतापर्यंत देशभरात ४,८५,०३५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
India reports 2,47,417 fresh COVID cases (27% higher than yesterday) and 84,825 recoveries in the last 24 hours
Active case: 11,17,531
Daily positivity rate: 13.11%Confirmed cases of Omicron: 5,488 pic.twitter.com/kSvYNqJHb2
— ANI (@ANI) January 13, 2022
याशिवाय ८४ हजार ८२५ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. तर, सध्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या ११,१७,५३१ वर पोहचली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १३.११ टक्के आहे. याशिवाय, ५ हजार ४८८ ओमायक्रॉन बाधितही आढळून आले आहेत.
ओमायक्रॉन म्हणजे सर्दीचा आजार नव्हे…
दरम्यान, ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी, कोरोनाच्या या उत्परिवर्तित विषाणूचा संसर्ग म्हणजे सर्दीचा आजार नव्हे, हे लक्षात घेऊन लोकांनी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे, असा इशारा कोरोना कृती गटाचे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील ३०० जिल्ह्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असून संसर्गदरही ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
महाराष्ट्रात लस टंचाई…
राज्यात लसीची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हास्तरावरून यावर विचारणा होत आहे. केंद्रीय मंत्र्यांना कळविले आहे. ५० लाख डोस कोव्हिशिल्ड आणि ४० लाख कोव्हॅक्सिनचे डोस हवे आहेत, असे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.