नायलॉन मांजा विकणाऱ्या दोघांवर कारवाई


नाशिक (प्रतिनिधी) : नायलॉन मांजा विक्रीस असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



पहिल्या घटनेत प्रथमेश प्रफुल्ल तांबोळी (रा. ओम्साई अपार्टमेंट, राठी आमराईसमोर, गंगापूर रोड) याने पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून राहत्या घराच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये भिंतीच्या आडोशाला नायलॉन मांजा विकत असल्याचे कळले. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून नायलॉन मांजा गुंडाळलेले २८ गट्टू असा सुमारे १९ हजार ६०० रुपयांचा मांजा तांबोळी याच्याकडून जप्त केला असून, त्याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत मरकड यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसऱ्या घटनेत नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असल्याचे माहीत असतानाही त्याची विक्री करणाऱ्या दुकानावर छापा मारण्यात आला आहे.



गौरव रमेश फरताळे (वय ३२, रा. तांबे मळा, शांतीनगर, मखमलाबाद रोड) हा घराच्या आवारात नायलॉन मांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानुसार म्हसरूळ पोलीस पथकाने या ठिकाणी छापा टाकला. त्यात मोनो पाईप कंपनीचा नायलॉन मांजा असलेले २३ गट्टू असा एकूण १६ हजार १०० रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस नाईक नीलेश पवार यांच्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार हळदे करीत आहेत.





Comments
Add Comment

वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च बहुमान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'संत एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार' जाहीर

पैठण : वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानकडून

लोणार सरोवराबाबत चिंतेची बाब; सरोवरात वाढतेय पाण्याची पातळी

बुलढाणा: पर्यटक आणि शास्त्रज्ञांचे आकर्षण केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील

नागपूर महापालिका निवडणूक: १५१ जागांसाठी प्रशासन सज्ज, दुबार मतदारांवर विशेष नजर

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त अभिजित चौधरी

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच