दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात बंधनकारक

मुंबई : राज्यातील सर्व दुकानांवरती मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. पण त्याची अंमलबजावणी व्हायची नाही, मात्र  आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात कराव्या लागणार आहेत. राज्य सरकारने आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून हा निर्णय बंधनकारक केला आहे त्यामुळे दुकानदारांना आता कसलीही पळवाट शोधता येणार नाही.

आता इतर भाषेच्या प्रमाणे मराठीतील नावही तेवढच मोठं ठेवावं लागणार आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017' हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याचीही मागणीही होत होती. आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला.
Comments
Add Comment

रुग्णांच्या आहाराची आता महापालिका घेणार अतिविशेष काळजी

दहा उपनगरीय रुग्णालयामध्ये आहार पुरवण्यासाठी मागवल्या निविदा आहार तज्ञांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच

दिवाळीपूर्वीच कोस्टल रोडच्या लगतची जळमटे केली साफ!

वरळीतील 'त्या' वाडीतील १६९ अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त मुंबई (खास प्रतिनिधी) : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती

महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ; माझगाव डॉक येथे दोन नौकांचे २७ ऑक्टोबर रोजी उद्घाटन

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ मिळणार आहे.

ईस्टर्न फ्रीवेसाठी मुंबईतील ३२० झाडे तोडणार!

मुंबई : घाटकोपर आणि ठाणे दरम्यानच्या ईस्टर्न फ्रीवे (महामार्ग) विस्ताराच्या कामाला मुंबई महापालिकेच्या (BMC)

दिवाळीच्या फटाक्यांमुळे तब्येतीला धोका!

मुंबई : दिवाळीमध्ये फटाक्यांची रोषणाई खूप छान दिसते, पण त्यामुळे हवेचे प्रदूषण खूप वाढले आहे. त्यामुळे

भायखळ्यातील ३५ बचत गटांना अशी झाली दिवाळीपूर्वी मदत

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावली निमित्त महिला बचत गटांनी बनवलेल्या फराळासह इतर वस्तूंच्या विक्रीसाठी मार्केट