नवी दिल्ली: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची लागण झाली आहे. २२ वर्षीय सुंदर भारतीय एकदिवसीय संघातील इतर क्रिकेटपटूसह बुधवारी (१२ जानेवारी) दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. आता तो आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर जाऊ शकतो.
प्रदीर्घ कालावधीनंतर सुंदरचे भारतीय संघात पुनरागमन झाले होते. इंग्लंड दौऱ्यावर सराव सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो जवळपास ६ महिने संघाबाहेर होता. यामुळे तो यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल २०२१ आणि टी-ट्वेन्टी विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यातूनही बाहेर पडला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका १९, २१ आणि २३ जानेवारी रोजी खेळली जाणार आहे. नियोजित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीवीर लोकेश राहुल हा संघाची धुरा सांभाळेल. भारताचा वनडे संघ : लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमरा(उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…