Thursday, October 23, 2025
Happy Diwali

वॉशिंग्टन सुंदरला कोरोना

वॉशिंग्टन सुंदरला कोरोना
नवी दिल्ली: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची लागण झाली आहे. २२ वर्षीय सुंदर भारतीय एकदिवसीय संघातील इतर क्रिकेटपटूसह बुधवारी (१२ जानेवारी) दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. आता तो आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. प्रदीर्घ कालावधीनंतर सुंदरचे भारतीय संघात पुनरागमन झाले होते. इंग्लंड दौऱ्यावर सराव सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो जवळपास ६ महिने संघाबाहेर होता. यामुळे तो यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल २०२१ आणि टी-ट्वेन्टी विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यातूनही बाहेर पडला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका १९, २१ आणि २३ जानेवारी रोजी खेळली जाणार आहे. नियोजित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीवीर लोकेश राहुल हा संघाची धुरा सांभाळेल. भारताचा वनडे संघ : लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमरा(उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >