पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील ढिलाईचा पनवेल भाजपतर्फे निषेध

Share

पनवेल : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पंजाबमध्ये प्राणांतिक संकट ओढवले होते. त्यांच्या सुरक्षेबाबत ज्या राज्यात त्यांचा दौरा होता त्या पंजाबमधील काँग्रेस सरकारने अक्षम्य दिरंगाई, बेजबाबदारपणा करून एक प्रकारे विघटनवादी शक्तींना मदत केली. त्यामुळे या घटनेचा आणि काँग्रेस सरकारचा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर यावेळी आयोजित करण्यात आलेल्या ‘वुई सपोर्ट पीएम मोदी’ या मोहिमेत कार्यकर्ते आणि नागरिकांनी ‘आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत’ अशी घोषणा देऊन स्वाक्षरी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच पंतप्रधान मोदी यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी विरुपाक्ष मंदिरात महामृत्युंजय जप करण्यात आला.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संगितले की, देशाचे पंतप्रधान राष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी पंजाबमध्ये जातात. तो कार्यक्रम पक्षाचा किंवा राजकीय नव्हता. तो शासकीय कार्यक्रम होता. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकल्पांचे त्या ठिकाणी भूमिपूजन होणार होते. अशा वेळेला पंतप्रधानांची वाट अडवली जाणे, त्याचा मार्ग ठरलेला असतो; ऐन वेळेला हेलिकॉप्टर जरी रद्द झाले तर त्यावेळी ज्या ठिकाणाहून मार्गक्रमण करणार त्या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेतली जाते. बंदोबस्त लावला असताना निदर्शो करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची वाट अडवली. अशावेळी निदर्शनकर्त्यांना ताब्यात घेणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेचे होते. ताब्यात घेतल्यानंतर कार्यक्रम झाल्यावर सुटका केली जाते. पण काँग्रेसचे मुख्यमंत्री यांनी जाणूनबुजून प्रोटोकॉल पाळला नाही.

तसेच निदर्शने करणाऱ्यांना राज्य सरकाराच्या माध्यमातून समजावणे गरजेचे होते. पंतप्रधान २० मिनिटे असुरक्षित ठिकाणी होते, त्यावेळी परिस्थिती निवळण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्र्यांनी मात्र तसे न करता निदर्शकांना एकप्रकारे सहकार्यच केले. संविधानिक पदावर असूनही मुख्यमंत्र्यांनी असे बेजबाबदारपणे वागणे योग्य नाही. त्यामुळे या घटनेचा निषेध करू तेवढा कमी आहे, असे सांगून मोदी यांनी २०१४ सालापासून केलेली कामे काँग्रेसच्या डोळ्यात खुपत आहेत. जागतिक स्तरावर मोदींचे कर्तृत्व मान्य केले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात परिवर्तन, नवा भारत घडतोय आणि हे काँग्रेस पक्षाला खुपते आहे. म्हणून मोदींवर आरोपांची चिखलफेक करणे, त्यांना अपयश यावे यासाठी सर्व थरातील प्रयत्न काँग्रेस पक्ष करतो हे याआधीही दिसले आहे आणि पंजाबच्या घटनेतून आणखी स्पष्ट झाले आहे. मात्र असे करत असताना पंतप्रधानांच्या सुरक्षेला धोका लागेल याची कुठलीही तमा पंजाब सरकरने बाळगली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले आहेत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, अभिषेक भोपी, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago