नवी दिल्ली : माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी त्यांचे अभिवादन करीत त्यांच्या कार्याचे स्मरण केले.
ट्वीटरद्वारे उपराष्ट्रपती म्हणाले की, ” देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री जी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस प्रणाम करतो. “जय जवान, जय किसान” हा त्यांचा नारा, देशाची सुरक्षा आणि समृद्धीचा मंत्र आहे. त्यांच्या आदर्शांचे, आचरणाचे अनुसरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली. विनम्र श्रद्धांजली. ” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.