मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. संपामुळे ग्रामीण भागातल्या जनतेचे हाल होताहेत, हे सरकारला आत्ता समजले? लाल परी धावत नसल्याने ग्रामीण भागातली प्रवास व्यवस्था लंगडी झाली आहे. त्याकडे लक्ष द्यायला शरद पवार यांना आजवर का वेळ झाला नाही? आजचा मुहूर्त होता का? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले आहे.
तसेच, बैठकीनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी मनोरंजन केले. एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही, असे परब सांगतात. मग आजवर कारवाई झालेल्यांचे काय? कारवाईची भीती मविआ सरकारवरील अविश्वासातून निर्माण होते आहे. कारवाई नाही, पगारवाढीसाठी चर्चा करू, विलिनीकरणाचे कोर्ट सांगेल ते पाहू… मग मविआ सरकारकडे कर्मचाऱ्यांसाठी आहेच काय?’, असाही प्रश्न पाटील यांनी विचारला आहे.
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…