ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये नवीन पंपिंग मशिनरी बसविण्यासाठी तसेच इतर अत्यावश्यक कामे करण्यासाठी बुधवार १२ जानेवारी रोजी सकाळी ९.०० ते गुरुवार, १३ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरू राहणार आहे.
१२ जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, समतानगर, आकृती, सिद्धेश्वर, जॉन्सन, इंटर्निटी, कोलशेत तसेच आझादनगर या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवार १२ जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ९.०० ते गुरुवार १३ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत ऋतुपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा व मुंब्रा परिसरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा साठा करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…