अर्थ फाउंडेशनने नाटीकेद्वारे पोहोचविला लैंगिक समानतेचा संदेश

नवीन पनवेल:'मर्द को भी दर्द होता है’, या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाऊंडेशनने सामाजिक संदेश देत लैंगिक समानतेच्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. रविवार दिनांक ९ जानेवारी रोजी पनवेलच्या ओरियन मॉलमध्ये केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली. अत्यंत संवेदनशील विषयाला हात घालत लैंगिक समानतेचा संदेश देण्यात अर्थ फाऊंडेशनच्या सदस्यांना चांगलेच यश मिळाल्याचे दिसून येत होते.



अर्थ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण कलमे म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघ यांनी शाश्वत विकास ध्येय डोळ्यापुढे ठेवली आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वच सदस्यांनी २०३० पर्यंत ही उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून कार्य करण्याचे एकमताने मंजूर केले आहे. १ जानेवारी २०१६ पासून संयुक्त राष्ट्र संघातील सगळे सदस्य शाश्वत विकास उद्दिष्टांवर काम करत आहेत. यामध्ये लैंगिक समानता, सामाजिक न्याय, शांतता, सशक्त राष्ट्र निर्मिती यासारख्या शाश्वत उद्दिष्टां द्वारे सुदृढ समाज व्यवस्था बनविण्याचे ध्येय्य डोळ्यापुढे ठेवण्यात आले आहे. आमच्या संस्थेने आज ‘मर्द को दर्द होता है’ ही प्रायोगिक नाटिका सादर करून स्त्री-पुरुष यांच्यातील भेदाभेद नष्ट करण्याचा एक छोटेखानी प्रयत्न केला आहे.


अत्यंत आशयघन पद्धतीने विद्यार्थ्यांनी नाटीका सादर केल्यामुळे रविवारच्या संध्याकाळी शॉपिंगसाठी आलेल्या नागरिकांनी काही मिनिटे थांबून या सादरीकरणाचा आनंद लुटला. नाटिका पाहून घरी जाताना प्रत्येकाच्या डोक्यात लैंगिक समानतेचा विषय रुंजी घालत असेल आणि हेच आमच्या उपक्रमाचे फलित असल्याचे प्रवीण कलमे यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रवीण कलमे यांच्यासोबत संस्थेच्या सीईओ प्रविणा कलमे, ग्लोबल ॲम्बेसेडर प्रथम कलमे, सीएमओ हेतल वाघ, सदस्य कृषीका शिरिशकर, इव्हेंट मॅनेजर विलास भोसले यांनी परिश्रम घेतले.

Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र