नाशिक: नाशिक येथील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नाही. संपकरी कर्मचारी हे आपल्या मागण्यायवर अडून बसले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे, असे कर्मचारी संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. परिवहनमंत्री अनिल परब आणि शरद पवार यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन संप मागे घेत असल्याचे जाहीर केले.
तसेच कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले. असे असतांना मात्र नाहीकमधील एसटी कर्मचारी संपावर ठाम असून विलनीकरणाची प्रमुख मागणी पूर्ण होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.नाशिक येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ‘आज बैठकीत समील झालेल्या २२ संघटनांशी आमचा संबंध नाही. आमचा दुखवटा आंदोलन सुरूच राहणार असून विलनीकरण होईपर्यंत संप सुरूच राहणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एका यशस्वी बैठकीनंतरही नाशिक मधील कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने विलीनीकरणाचा तिढा कायम राहिला आहे.
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…