नवी दिल्ली : देशात रविवारी नवीन कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखांच्या पुढे गेला असून एका दिवसात सापडलेल्या कोरोनाबाधितांची ही सर्वात मोठी संख्या आहे. रविवारी १ लाख ५९ हजार ६३२ नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्याच वेळी ४० हजार ८६३ रुग्ण बरे झाले आहेत.
गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३२७ मृत्यू झाले आहेत. दैनिक पॉझिटिव्हीटी रेट १०.२१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३,४४,५३,६०३ आहे. तर ४,८३,७९० लोकांना या संसर्गजन्य आजाराने आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत एकूण १५१.५८ कोटी इतके लसीकरण करण्यात आले आहे.
India reports 1,59,632 fresh COVID cases, 40,863 recoveries, and 327 deaths in the last 24 hours
Daily positivity rate: 10.21%
Active cases: 5,90,611
Total recoveries: 3,44,53,603
Death toll: 4,83,790Total vaccination: 151.58 crore doses pic.twitter.com/Qmm2qQcHOS
— ANI (@ANI) January 9, 2022
देशातील ओमायक्रॉनच्या ३ हजार ६२३ प्रकरणांपैकी १४०९ लोक बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या १००९ रुग्णांपैकी ४३९ लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी, दिल्लीतील ओमायक्रॉनच्या ५१३ प्रकरणांपैकी ५७ लोक बरे झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाख ९० हजार ६११ झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख ८३ हजार ७९० झाली आहे.