
नवी दिल्ली : ''बाहुबली'' या चित्रपटात ''कटप्पा''ची भूमिका साकारणारे दिग्गज स्टार सत्यराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रकृती बिघडल्याने सत्यराज यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी सत्यराज यांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आधी सत्यराज हे होम आयसोलेशनमध्ये होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने सत्यराज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सत्यराज यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.