मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णसंख्येने दैनंदिन २० हजारांचा टप्पा पार केला आहे. २० ते ३० टक्के रुग्णसंख्या नियमीत वाढत असून रुग्णांना तत्काळ उपचार देणे गरजेचे आहे. त्यामुळे ठराविक रुग्णालयात दाखल करा, अशी रुग्णांची मागणी आता पालिका ऐकणार नसून पालिका सांगणार त्याच रुग्णालयात रुग्णांना दाखल व्हावे लागणार आहे. बाधित रुग्णावर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे यासाठी पालिका पाठवेल त्याच रुग्णालयात रुग्णाला दाखल व्हावे लागणार आहे.
सध्याची कोरोना रुग्णसंख्या पाहता गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी कोरोनाची तीव्रता जास्त असल्याचे दिसून येत असून दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेचा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे रुग्णांवर आधी उपचार करणे गरजेचे आहे.
पालिकेच्या वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून रुग्णांना संपर्कात ठेवले जाणार असून त्यांच्याद्वारे दाखल केले जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर रुग्णांवर वेळीच उपचार व्हावे यासाठी ३५ हजारांहून अधिक खाटा पालिकेने तैनात ठेवल्या आहेत.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…