मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेतर्फे वांद्रे टर्मिनस आणि अजमेर दरम्यान विशेष भाडे आकारून सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
ट्रेन क्रमांक ०९६२२ वांद्रे टर्मिनस-अजमेर सुपरफास्ट स्पेशल (साप्ताहिक) ट्रेन प्रत्येक सोमवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी ११.१५ वाजता सुटेल आणि पुढच्या दिवशी सकाळी ९.१० वाजता अजमेर पोहचेल. ही ट्रेन १०,१७, २४ आणि ३१ जानेवारी २०२२ या दिवशी असेल. तर ट्रेन क्रमांक ०९६२१ अजमेर-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक रविवारी अजमेर येथून सकाळी ६.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ४.१५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहचेल.
ही ट्रेन ९, १६, २३ आणि ३० जानेवारी २०२२ या दिवशी असेल. ही ट्रेन प्रवासादरम्यान बोरीवली, वापी, सूरत, बडोदा, रतलाम, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, जयपूर और किशनगढ या स्थानकांवर थांबेल.
या रेल्वेबाबतच्या अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in येथे भेट द्या.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…