ओम कदमला ज्युनियर गटाचे जेतेपद

मुंबई  : मुंबईचा अग्रमानांकित इंडिया कॅडेट इंटरनॅशनल ओम कदमने अपेक्षेनुसार आयआयएफएल मुंबई ज्युनियर (१३ वर्षाखालील ) बुद्धिबळ स्पर्धा सर्वच्या सर्व ९ डावातील दमदार विजयासह जिंकली. शेवटच्या आणि नवव्या फेरीत अन्या रॉयला पराभूत करीत ९ गुणांसह झळाळत्या चषकावर आपले नाव कोरले. त्याने ट्रॉफीसह ५० हजार रुपयांचे घसघशीत रोख पारितोषिकही मिळवले.



कफ परेड भागात खेळवण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ स्पर्धेत ज्युनिअर गटात गौरांग बागवेने अर्जुन आदिरेड्डीला पराभूत करत दुसऱ्या स्थान मिळवताना रोख ३० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. मानस गायकवाडने तिसऱ्या स्थानासह २० हजार रुपये तर यश भराडियाने चौथ्या स्थानासह १५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. पाचव्या स्थानावर आलेल्या पारस भोइरला १० हजाराचे बक्षीस देण्यात आले.



जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या (फिडे ) नॉर्मनुसार आयोजित आयआयएफएल मुंबई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन मुंबई चेस स्कूलने मुंबई शहर बुद्धिबळ संघटना , महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने केले होते. स्पर्धेचे संचालन फिडेचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संयोजक प्रफुल्ल झवेरी यांनी केले. तर मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय ऑर्बिटर पी बी भिलारे यांनी धुरा सांभाळली. विजेत्या बुद्धिबळपटूंना रोख अडीच लाख रुपये आणि ३० पदके पारितोषिका दाखल देण्यात आली.




अन्या रॉय सर्वोत्तम कन्या बुद्धिबळपटू



स्पर्धेतील सर्वोत्तम कन्या बुद्धिबळपटू म्हणून अन्या रॉयला ७,५०० रुपये तर दुसऱ्या स्थानासाठी स्वस्ती झा हिला ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण