क्रीडा भवन सुरू करण्याकडे दुर्लक्ष

मुंबई  : गेल्या ११ वर्षांपासून मुंबईतील महापालिका मुख्यालयासमोर तसेच शिवाजी पार्क येथील पालिकेची क्रीडा भवन बंद आहेत. ही क्रीडा भवन पुन्हा सुरू करण्यासाठी सन २०१७ मध्ये विधी समितीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यावेळी क्रीडा भवनासाठी नियमावली तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र असे असूनही पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून क्रीडा भवन सुरू करण्यासाठी प्रशासनाची कोणतीही हालचाल दिसत नसल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे.



मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा गुणांना उभारी देण्यासाठी पालिका प्रशासनाने १९२६ मध्ये क्रीडा भवनाची स्थापना केली तर २०१० मध्ये क्रीडा भवनाच्या कार्यकारिणीमधील सदस्यांवर झालेल्या गैरकारभाराच्या आरोपानंतर क्रीडा भवन बंद करण्यात आले होते. मात्र ते उघडण्यासाठी २०१७ मध्ये विधी समिती व पालिका सभागृहात क्रीडा भवन सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यावेळी नवीन नियमावली तयार करण्याचे नगरसेवकांनी सुचवूनही गेल्या चार वर्षांत नियमावली तयार झालेली नाही. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन

कृत्रिम फुले आणि खेळण्यांच्या रंगांमुळे कर्करोगाचा धोका; विक्रम पाचपुते यांचा इशारा

मुंबई: विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी एक गंभीर

Holi Special ST Buses : होळीसाठी धावणार एसटीच्या १९३ बस; महामंडळातर्फे विशेष सेवा जारी

मुंबई : राज्यभरात होळीच्या सणाची तयारी सुरु झालीये. देवांच्या पालख्या घरोघरी येऊ लागल्या आहेत, त्यामुळे

प्रकल्प स्मार्ट अंतर्गत मुंबई - अहमदाबाद उच्चगती रेल्वे स्थानक क्षेत्र विकासाला एमएमआरडीएची गती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे

मराठीला रोजगार आणि जागतिक ओळखीची भाषा बनवणार - मराठी संवर्धनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : मराठी ही केवळ संस्कृतीची नव्हे तर अर्थकारण आणि रोजगाराचीही भाषा व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे

Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट, काय म्हणाले?

मुंबई: आज 'मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट लिहित मराठीजनांना,