Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीजैश-ए-मोहम्मदच्या लोकल हँडलरचा शोध सुरू

जैश-ए-मोहम्मदच्या लोकल हँडलरचा शोध सुरू

- संघ मुख्यालयाच्या रेकीचे प्रकरण

नागपूर : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने नागपुरात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी केल्याची माहिती पुढे आलीय. काश्मिरातून नागपूरला येऊन रेकी करणाऱ्या या दहशतवाद्याचा स्थानिक सहकारी (लोकल हँडलर) कोण याचा पोलिस शोध घेत आहेत.

जम्मू काश्मिरात काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला पोलिसांनी हँन्ड ग्रेनेडसह अटक केली. चौकशीदरम्यान या दहशतवाद्याने जुलै 2021 मध्ये नागपुरातील रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परीसराची रेकी केल्याची माहिती सुरक्षा संस्थांना दिली. हा दहशतवादी जुलै 2021 मध्ये विमानाने नागपूरला आला होता. नागपुरात आल्यानंतर तो सीताबर्डी परिसरातील एका लॉजमध्ये वास्तव्याला होता. नागपुरात दोन दिवस त्याचा मुक्काम होता. ही माहिती पुढे आल्यानंतर याबाबत नागपूर पोलिसांना कळवण्यात आले. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी ‘अनलॉफुल एक्टिव्हीटी प्रिव्हेन्शन एक्ट’ (यूएपीए) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तसेच पोलिसांचे एक पथक या दहशतवाद्याच्या चौकशीसाठी श्रीनगरला रवाना झाले. दरम्यान जैश ए मोहम्मदचा स्लीपर सेल म्हणून काम करणारा तो तरुण नागपुरात असताना त्याला स्थानिक पातळीवर कोणी मदत केली होती का याचा शोध ही आता नागपूर पोलीस घेत आहेत.

अतिशय गंभीर प्रकरण- फडणवीस

जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने नागपुरात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी केल्या प्रकरणी प्रतिक्रिया देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संघाच्या इमारतींची जैश-ए-मोहम्मद कडून रेकी होणे अतिशय गंभीर बाब आहे. याची माहिती आता पोलिसांना आणि केंद्रीय यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे यासंदर्भात योग्य खबरदारी महाराष्ट्राचे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा घेतील. हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -