
नवी दिल्ली : ओमायक्रॉन संपूर्ण देशात पसरला असून बाधितांबरोबरच या व्हेरियंटमुळे लोकांचा जीव जाण्यास सुरुवात झाली आहे. राजस्थानमध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला बळी गेल्यानंतर आता देशात याच व्हेरियंटने ओडीशात दुसरा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रेणेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
ओडीशामधील बोलांगीरमध्ये ५५ वर्षांच्या एका महिलेचा ओमायक्रॉनमुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका ७३ वर्षांच्या वृद्धाचा ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झाला होता. या दोन्ही व्यक्तींनी बाधित होण्यापूर्वी विदेशवारी केलेली नव्हती.