पटोलेंनी सोनिया गांधींनाच खोटे पाडले

मुंबई  : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली तर युवराज राहुल गांधी खुश होतात, हे ठाऊक असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बरळू लागले आहेत. मात्र आपल्या बरळण्यामुळे आपण पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनाच खोटे ठरवत आहोत याचे भान नाना पटोले यांना राहिलेले नाही, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.



उपाध्ये यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बोलताना नाना पटोले यांनी आपली पात्रता तपासून घ्यावी, असे आम्ही सुचवणार नाही. घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार पटोलेंना आपले मत व्यक्त करण्याचे पुरेपूर स्वातंत्र्य आहे. मात्र विचार करून बोलणे आणि बरळणे यातील फरक त्यांच्या लक्षात आलेला नाही.


काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ढिलाईबद्दल पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची कानउघाडणी केल्याचे वृत्त पटोलेंच्या वाचण्यात आले नसावे. हे वृत्त वाचले असल्यास त्याचा अर्थ त्यांच्या लक्षात आला नसावा. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई झाल्याचे खुद्द सोनिया गांधी मान्य करत आहेत. पटोले मात्र सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई झाली नसल्याचेच वारंवार सांगत आहेत, असे उपाध्ये म्हणाले.

Comments
Add Comment

'या' तारखेपासून विंडोज १०चा सपोर्ट होणार बंद

वॉशिंग्टन डीसी :  टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जगभरात मोठ्या

मुंबईतले आठ हजार बॅनर हटवले

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबईत नवरात्रौत्सवात मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचे बॅनर आणि फलक लावण्यात आले होते. यामुळे

रिया चक्रवर्तीला दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाने पासपोर्ट परत करण्याचे दिले आदेश!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : मॅनेजरनेच दिले विष, समोर आली धक्कादायक माहिती

सिंगापूर : सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग याचा १९ सप्टेंबरला सिंगापूर येथे नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिवल दरम्यान बुडून

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक