मुंबई : भाजपा महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. आणि या वादात आता राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी उडी घेतली आहे. या वादाबाबत विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
मात्र निषेध व्यक्त करताना त्यांनी त्यात अमृता फडणवीस यांनाही याप्रकरणात ओढलं आहे. रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरं झालं. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असतीर तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती, असं विधान विद्या चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.