नवी दिल्ली : दिल्लीत राहणा-या अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण झाली आहे. स्वराने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबातील काही सदस्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली असून कुटुंबीयांसह अभिनेत्री घरातच विलगीकरणात गेली आहे.
स्वराने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. सर्वांना सुरक्षित राहण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहनही स्वराने पोस्टमध्ये केले आहे.
Hello Covid! 😬
Just got my RT-PCR test resulted and have tested positive. Been isolating & in quarantine. Symptoms include fever, a splitting headache and loss of taste. Double vaccinated so hope this passes soon. 🤞🏾
SO grateful for family & to be at home.
Stay safe everyone 🙏🏽 pic.twitter.com/2vk7Ei7QyG— Swara Bhasker (@ReallySwara) January 6, 2022
स्वराने लिहिले आहे की, हॅलो कोविड, नुकताच माझा आरटीपीसीआर रिपोर्ट मिळाला आहे आणि मी कोविड पॉझिटिव्ह आहे. स्वतः घरात विलगीकरणात गेले आहे. ताप, डोकेदुखी आणि चव कमी होणे यासारखी लक्षणे मला आहेत. मी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यामुळे लवकरच सर्व काही ठीक होईल अशी आशा आहे. कुटुंबाबद्दल आभारी आहे आणि मी घरी आहे. तुम्हीही सुरक्षित रहा आणि मास्क घाला.