अयोध्या : अयोध्येमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे झटके बसलेत. नॅशनल सेंटर फॉर समीस्मोलॉजीने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता 4.3 इतकी होती. या भूकंपामध्ये कोणतीही जिवीत अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंपाचे झटके जाणवल्याने काही ठिकाणी नागरिक आपआपल्या घरांच्या बाहेर पळत आल्याची माहिती प्रादेशिक वेबसाईट्सने दिलीय.
एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार या भूकांपाचा केंद्रबिंदू अयोध्येच्या उत्तर आणि ईशान्येकडे 176 किलोमीटरवर होता. नेपाळमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जमीनीखाली 15 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे हदरे बसले. याबाबत एससीएसने मध्यरात्री 1 वाजून 5 मिनीटांनी ट्वीट करत सांगितले की, 6 जानेवारी 2022 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनीटे आणि 22 सेकेंदांनी अयोध्येपासून 176 किलोमीटर अंतरावर भूकंप झाला. लॅटीट्यूड 28.14 आणि लॉन्जीट्यूड 83.14 वर 15 किलोमीटरच्या खोलीवर झालेल्या या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल असल्याचे या ट्वीट मध्ये नमूद केलेय.