८० टक्के खाटा ११ जानेवारीपर्यंत ताब्यात द्या!

  66

मुंबई  : मुंबईमध्ये कोरोना आणि उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व खासगी रुग्णालय आणि नर्सिंग होममधील ८० टक्के खाटा ११ जानेवारीपर्यंत पालिकेच्या ताब्यात द्या, असे आदेश पालिकेने सर्व खासगी रुग्णालयांना दिले आहेत.

मुंबईमध्ये डिसेंबरपासून रुग्णसंख्या वाढली आहे. २१ डिसेंबरपासून ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूमुळे ही रुग्णसंख्या वाढत आहे. दिवसभरातील ९० टक्के रुग्ण इमारतीमधून आढळून येत आहेत. रोज आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण लक्षणे असलेले आहेत. या रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेने खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुसऱ्या लाटेदरम्यान ५ मे २०२१ रोजी प्रमाणे ११ जानेवारीपर्यंत पालिकेच्या ताब्यात खाटा देण्याच्या सूचना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत.

खासगी रुग्णालये, नर्सिंग होममधील ८० टक्के खाटा आणि १०० टक्के आयसीयू खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात. खाटांवर कोविड रुग्णांना भरती करण्यासाठी पालिकेच्या वॉर्ड वॉर रूमच्या सल्ल्यानुसार भरती करावे. राज्य सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार रुग्णांकडून बिल घ्यावे. सर्व रुग्णालयांनी लागणारी औषधे, ऑक्सिजन, पीपीई किट, मास्क, उपकरणे यासह सज्ज राहावे असे आदेश देण्यात आले आहेत.
Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २०

मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की राजकीय नौटंकी!

भाजपा नेत्यांनी उडवली ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची खिल्ली! मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका