नागपूर : महिला काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीवरून महिला काँग्रेसमध्ये खदखद आणि नाराजी नाट्य समोर आले आहे. नागपूर महिला काँग्रेसच्या तब्बल १८० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात असंतोष वाढला आहे.
नागपूर शहर काँग्रेसने नॅश अली यांची अध्यक्षपदी निवड केली. मात्र त्यांचे पक्षात काम नाही, अनुभव नाही, त्यामुळे त्यांच्याऐवजी कुठल्याही अनुभवी पदाधिकाऱ्याला अध्यक्ष करावे, अशी मागणी या नाराज महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.