भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य

जोहान्सबर्ग : दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २४० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
२ बाद ८५वरून भारताने दुसऱ्या डावात बुधवारी २३९ धावांची मजल मारली. त्याचे क्रेडिट चेतेश्वर पुजारा (५३ धावा)आणि अजिंक्य रहाणे (५८ धावा) या सीनियर्ससह अष्टपैलू हनुमा विहारी (नाबाद ४० धावा) तसेच शार्दूल ठाकूरला (२८ धावा) जाते. दक्षिण आफ्रिकेने बोनस म्हणून दिलेल्या ३३ अवांतर धावा भारताला अडीचशेच्या घरात पोहोचवण्यास मोलाच्या ठरल्या.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत होते. पुजाराला दुसऱ्या डावात अखेर सूर गवसला. त्याने अर्धशतक झळकावलं. कसोटी कारकिर्दीतील त्याचं ३२ वं अर्धशतक आहे. त्यानंतर लगेचच अजिंक्य रहाणेने अर्धशतकी पूर्ण केले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली आहे. शतकी भागीदारी फोडण्यात कागिसो रबाडाला यश आलं. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा त्याच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रिषभ पंतला भोपळाही फोडता आला नाही. तीन चेंडू खेळून रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

आर. अश्विन आणि हनुमा विहारी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र लुन्गी एन्गिडीच्या गोलंदाजीवर अश्विन झेलबाद झाला. आर. अश्विन १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या शार्दुल ठाकूरने झटपट खेळी करत २४ चेंडूंत २८ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार ठोकला. मात्र मार्को जॅन्सेनच्या गोलंदाजीवर बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद शमी खातंही खोलू शकला नाही. मार्कोच्या गोलंदाजीवर बाद झाला. जसप्रीत बुमराच्या रुपाने भारताना नववा धक्का बसला आहे. बुमराहने १४ चेंडूंत ७ धावा केल्या. यात एका षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद सिराजही खातेही उघडू शकला नाही. अष्टपैलू हनुमा विहारी ४० धावांवर नाबाद राहिला.

दक्षिण आफ्रिकेकडून रबाडासह एन्गिडी तसेच जॅन्सेनने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. मात्र, यजमान गोलंदाजांनी ३३ धावांचा बोनसही दिला. त्यात १६ बाइजसह ८ नोबॉल आणि ५ वाइड चेंडूंचा समावेश आहे.
पहिल्या डावात भारताने २०२ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण अफ्रिका संघाने २२९ धावा केल्या आणि २७ धावांची आघाडी घेतली होती.
Comments
Add Comment

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.

बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना

द. आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ५ गडी राखून विजय

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील सुपर आठ फेरीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेचा