मुंबई विद्यापीठाला युवासेनेचे अड्डे बनवण्याचे षडयंत्र



मुंबई : राज्यातील विद्यापीठे युवासेनेचे अड्डे बनवण्याचे षडयंत्र सुरू आहे. हे पिढ्या बरबाद करण्याचे कारस्थान आहे. आपण आज लढलो नाही, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. राज्य सरकारने विद्यापीठ कायद्याचे विधेयक अवैध पद्धतीने मंजूर केले. हा कायदा मागे घेतला गेला नाही तर यांच्याविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.



दादर येथील वसंत स्मृती या मुंबई भाजप कार्यालयात भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक बुधवारी पार पडली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने आणणेला विद्यापीठ कायदा हा काळा कायदा आहे. त्यावर एक व्यक्ती विद्यापीठाचा, एक राज्यपालाचा आणि तीन व्यक्ती सरकारचे असतील. जेवढ्या नेमणुका महाविकास आघाडी सरकारने केल्या तिथे तिथे भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. येणाऱ्या काळात राज्यात कुलगुरूपदाचा लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप त्यांनी केला.



याविरोधात आपल्याला लढावेच लागेल. अन्यथा, ज्यावेळी आमची विद्यापीठे विकली जात होती, ती राजकारणाची अड्डे बनत होती, तेव्हा तुम्ही काय करत होतात, असा प्रश्न येणाऱ्या पिढ्या विचारतील. एकीकडे मोदी भ्रष्टाचारमुक्त कारभार करत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार भ्रष्टाचारयुक्त कारभार करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.



मी तमिळनाडूतील विद्यापीठात खूप भ्रष्टाचार पाहिला. कुलगुरूंच्या निवडीसाठी दहा कोटी घेतले जात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजप सरकारच्या कार्यकाळात केलेल्या विद्यापीठ कायद्याचे तामिळनाडूच्या राज्यपालांनी कौतुक केले होते. आम्ही केलेला हा विद्यापीठ कायदा जसाच्या तसा तामिळनाडू सरकारने लागू केला. मात्र, महाविकास आघाडी सरकारने आता तोच कायदा बदलला आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Comments
Add Comment

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज, भारतात सूतक काळ लागू होणार की नाही? घ्या जाणून....

मुंबई : वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी लागणार आहे, परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नाही.

Maharashtra Rain: राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबई (वार्ताहर) : राज्यातील काही भागात मागील दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागात हलक्या ते मध्यम

ठाणे, कडोंमपाची जबाबदारी राज ठाकरेंवर; उबाठा गट मुंबईवरच लक्ष ठेवणार!

मुंबई : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून चर्चा रंगलेली असतानाच या दोन्ही भावांमध्ये मुंबई आणि ठाणे

मराठीचा टेंभा मिरवणारे मनसे नेते संदीप देशपांडे भाजपकडून ट्रोल

स्वत:च्या हॉटेलातही मराठी आचारी नाही मुंबई : मराठी भाषा, स्थानिकांना रोजगार, भूमिपुत्रांना न्याय या

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

पर्यटन आणि उद्योगांना चालना मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतनिधीला मंजुरी

मुंबई : अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसल्यामुळे नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान