भीषण रस्ता अपघातात 15 जणांचा मृत्यू

रांची : झारखंडच्या पाकूर जिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. आम्रपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडेर कोला गावाजवळ हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिट्टीपारा-आम्रापाडा मुख्य रस्त्यावर पडेर कोलाजवळ एक खाजगी बस आणि सिलेंडरने भरलेल्या ट्रकची समोरा समोर धडक झाली. अनियंत्रित ट्रक बसवर जोरात आदळला. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. मृतांमध्ये बहुतांश जण हे बसमध्ये प्रवास करत होते. मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.


अपघातग्रस्त प्रवाशांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

ही बस साहिबगंजहून दुमकाकडे जात होती. पाकूरचे एसपी एचपी जनार्दन यांनी सांगितले की, आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बसमधील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. बसमधून बरेच लोक रस्त्यावर पडले किंवा जखमी झाले, तर बरेच लोक आत अडकले. जखमी आणि मृतांना बसमधून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

Comments
Add Comment

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील