ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत बारवी गुरुत्व जलवाहिनीचे देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने गुरुवार दिनांक ६ जानेवारी,२०२२ रोजी रात्रौ १२.०० ते शुक्रवार दिनांक ७ जानेवारी,२०२२ रोजी रात्रौ १२.०० वाजेपर्यंत ठाणे शहरातील दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत मुंब्रा बायपास पासून मुंब्रा फायरब्रिगेड पर्यंत ( किस्मत कॉलनी, चांद नगर, एम. एम.व्हॅली, अमृतनगर, अल्मास कॉलनी) तसेच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग व कोलशेत, वागळे इस्टेट मधील काही परिसराचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे.

या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.





Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई