सावित्रीबाई खऱ्या अर्थाने देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी - उपमुख्यमंत्री

सातारा : क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थाने देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. सावित्रीबाईंनी स्त्रीसक्षमीकरणासाठी काम केले. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्या सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नायगाव या जन्मगावी जाऊन आदरांजली वाहिली. सावित्रीबाईंचे जन्मगाव नायगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावित्रीबाईंचे जन्मगाव नायगाव ता. खंडाळा, जि. सातारा येथे जाऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी उपुख्यमंत्री बोलत होते.


क्रांतिज्योती सावित्रीबाई यांचा जन्मदिन राज्य शासनातर्फे ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जातो. राज्यातील जनतेला ‘महिला शिक्षण दिना’च्याही उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंची समर्थ साथ लाभली. देशात स्त्रीयांची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरु केली आणि त्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका होण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी उचलली. स्त्रियांच्या शिक्षणासाठी या दोघांनी केलेलं कार्य व घेतलेले कष्ट सदैव स्मरणात राहतील. देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहे. स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे, याचं श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात स्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट व सहन केलेल्या हालअपेष्टांना आहे. जयंतीदिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन.


नायगाव येथे आयोजित कार्यक्रमाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, नायगावाच्या सरपंच पूनम नेवसे आदि उपस्थित होते.

Comments
Add Comment

Pune Crime News : आधी अपहरण, मग हत्या अन् थेट...पुण्यातील १७ वर्षांच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, भयानक प्रकार उघड

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाचा

जळगावात महायुतीचे शक्ती प्रदर्शन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रॅलीला प्रचंड गर्दी जळगाव : जळगाव शहरात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतील सात प्रभागांमध्ये युती आणि आघाडीचे उमेदवारच आमने-सामने

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा महायुती तसेच उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस

शॉर्ट सर्किटमुळे ‘समृद्धी’वर खासगी बसला अपघात

३६ प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला मलकापूर (प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर

राजमाता जिजाऊ बदनामी प्रकरणात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २२ वर्षांनंतर मागितली माफी

पुणे : जेम्स लेनच्या 'शिवाजी-हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकावरून दोन दशकांपूर्वी

पुणे : कोथरुडमध्ये उबाठा उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग