Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

किसान रेल शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी : देवेंद्र फडणवीस

किसान रेल शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी : देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘किसान रेल‘ उपक्रम सुरु केल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करीत आभार मानले.


ट्वीटरद्वारे फडणवीस म्हणाले, "शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रारंभ केलेल्या अनेक उपक्रमांपैकी ‘किसान रेल‘ हा एक उपक्रम. जालना येथून किसान रेलचा प्रारंभ झाला. ही किसान रेल आसाममध्ये जाईल. मला येथे हे आवर्जून सांगितले पाहिजे की, आतापर्यंत ज्या सुमारे 1650 किसान रेल चालल्या, त्यापैकी 75 टक्के या महाराष्ट्रातून धावल्या. पहिल्या ‘किसान रेल‘चा बहुमान सुद्धा महाराष्ट्रालाच मिळाला होता. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे खूप खूप आभार!


शेतमालाची देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात वाहतूक यामुळे सोपी होते. त्यामुळे भाजीपाला, फळे याची देशात जेथे जी मागणी आहे, तेथे त्याचा पुरवठा करता येतो. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला बाजारपेठ सहज उपलब्ध होते. सुमारे 6 लाख टन शेतमालाची वाहतूक किसान रेलने आतापर्यंत केली आहे."

Comments
Add Comment