मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात जास्त नागरिक हे विना मास्क फिरताना दिसतात. तसेच काही फेरीवाले व भाजीविक्रेते, दुकानदार, व्यवसायिक देखील मास्कचा वापर न करताना आढळून येतात. अशा व्यक्तींवर व फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे.
त्याचबरोबर अशा बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिका व पोलीस प्रशासन एकत्र मिळून कारवाई करणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले आहे.


मागील काही दिवसांत राज्यात तसेच मीरा-भाईंदर शहरात कोविड रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिका सज्ज झाली असून त्या आनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले यांनी ०१ जानेवारी रोजी आपत्कालीन बैठक आयोजित केली होती.
प्रभाग क्रमांक २ च्या अंतर्गत रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्या, दुकानात गर्दी जमा करून मास्कचा वापर न करणाऱ्या,भाजीविक्री करताना मास्क न वापरणाऱ्या सर्व बेजबाबदार दुकानदार, नागरिक यांच्याकडून कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसूल करण्यात आला आहे.


मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून प्रभाग २ अंतर्गत एकूण ११ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती प्रभाग अधिकारी प्रियंका भोसले यांनी दिली आहे. सर्वांनी मास्कचा वापर करा व कोविड नियमांचे पालन करावे, असे देखील भोसले यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

'बाल आधार' नोंदणीतील त्रुटींनी पालक त्रस्त

यूआयडीएआयकडे तातडीने उपाययोजनेची मागणी लहान मुलांच्या नवीन आधार नोंदणी प्रक्रियेत कागदपत्रांमधील

पोलीस स्टेशनच्या आवारात सोयीसुविधांसह ५५ हजार घरे बांधणार

प्रकल्पाचा अभ्यास व शिफारसीसाठी समिती स्थापन मुंबई  :  गणेशोत्सव असो नवरात्रोत्सव

मुंबईच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी झाडूंवर दीड कोटींचा खर्च!

मुंबई (प्रतिनिधी) :  स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाला झाडू खरेदीसाठी दरवर्षी दीड कोटी खर्च

अकरावीच्या प्रवेशासाठी ६ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

अजूनही राज्यात ८ लाख ३५ हजार जागा रिक्तच मुंबई (प्रतिनिधी) :  शाळांचे वर्ग सुरू होऊन तीन महिने

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल व सुधारणा कामांसाठी मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर विविध देखभाल, सिग्नलिंग आणि यार्ड रीमॉडेलिंगसाठी मेगाब्लॉक

पीएमजीपीच्या १७ अति धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा मुहूर्त निश्चित

डिसेंबरनंतर होणार कामांना सुरुवात मुंबई (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्ष रखडलेल्या अंधेरी (पूर्व)