रत्नागिरी : चिपळूण शहरातील खाटीक गल्ली येथील एका बंद घराला काल (दि. २९ डिसेंबर) भीषण आग लागली. घरी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत घरातील विविध वस्तू व साहित्य जळून खाक झाले. त्यात लाखोंचे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली. आग कशामुळे लागली त्याचे कारण समजू शकलेले नाही.
शहरातील खाटीक गल्ली येथील आरशद मेहता सहीबोले हे आपल्या कुटुंबासह परदेशी असतात. त्यांचा फरदीन हा मुलगा त्यांच्या धामणदेवी येथील बहिणीकडे राहतो. त्यामुळे त्यांचे शहरातील घर बंदच असते. त्याच्या घराला आग लागली.