मुंबई: झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका अतिशय गाजतेय. त्यामधील श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी आणि छोट्या परीचा निरागस अभिनय याची चर्चा घराघरात होतेय. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. मालिकेच्या कथानकाच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे.
सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि परांजपे याचं खरं रूप सगळ्यांसमोर येत आणि नेहाशी त्यांचं लग्न मोडतं. यशच्या मनात नेहा बद्दल प्रेम आहे. या भावनेची जाणीव तर यशला झाली आहे. पण नेहासमोर ते प्रेम व्यक्त करण्याची हिम्मत तो करत नाही आहे. अनेकदा आपली खरी ओळख नेहाला सांगण्याचा प्रयत्न यश करतो. पण ते ही असफल होतं. परांजपे यशचा वचपा काढण्यासाठी यशच्या आधीच नेहाला त्याची खरी ओळख सांगतो आणि नेहाला या गोष्टीचा धक्का बसतो.
दुसरीकडे समीर यशला नेहासमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आग्रह करतो. यश नेहाला सगळं खरं सांगण्याचं मनाशी पक्क करतो. पण त्याच्याआधीच नेहाला यशाची खरी ओळख पटली आहे त्यामुळे नेहा आता यशची बाजू ऐकून घेईल का? यश नेहासमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करू शकेल का? नेहा आणि यशच मैत्रीचं नातं प्रेमात बदलेल कि तिथेच संपेल? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…