मुंबई : आर्थिक वर्ष 2020-21 करीता आयकर विवरणपत्र दाखल (Income Tax Return filing)करण्यासाठी आता शेवटचे काही दिवस उरले आहेत. तर, दुसरीकडे आयकर खात्याच्या वेबपोर्टलविरोधात असंतोष वाढत आहे. ITR दाखल करण्यासाठी शेवटची मुदत 31 डिसेंबर आहे. ही मुदत वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी सोशल मीडियावर #Extend_Due_Date_Immediately हा हॅशटॅग ट्रेंडही करण्यात आला.
केंद्र सरकारने याआधी Income Tax Return दाखल करण्याची मुदत ही 31 जुलैहून 30 सप्टेंबर आणि त्यानंतर आता 31 डिसेंबर केली होती. Income Tax Return दाखल करताना वेबसाइटवर येणाऱ्या अडचणींमुळे काही दिवस साइट बंद होती. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा करदात्यांनी मुदतवाढीची मागणी केली आहे. आताही ITR दाखल करताना वेबसाइटमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.
सीए, वैयक्तिरीत्या ITR दाखल करणाऱ्यांनी सोशल मीडियावर #Extend_Due_Date_Immediately हा हॅशटॅग ट्रेंड केला. अनेकांनी उपरोधिकपणे सरकारवर टीकाही केली आहे. एका ट्विटर युजरने म्हटले की, 31 डिसेंबर ही शेवटची मुदत ITR चे सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्यांसाठी आहे. करदात्यांना पुरेसा वेळ न मिळाल्याने ही मुदत करदात्यांसाठी नाही, असेही त्यांनी म्हटले. अनेकांनी मीम्सही तयार केले आहेत.
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…