पंतप्रधान मोदी आज कानपूर दौऱ्यावर

कानपूर : आज पंतप्रधान नरेंद्रल मोदी उत्तर प्रदेशातील कानपूरला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता आयआयटी (IIT) कानपूरच्या 54 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. तेथील विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. यासह पंतप्रधान मोदी आज दुपारी दीड वाजता कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्ण भागाचे उद्घाटन करतील. यावेळी बिना-पंकी बहुउत्पादन पाईपलाईन प्रकल्पाचे उद्घाटनही करण्यात येईल.

मेट्रो रेल्वे प्रकल्पाची लांबी 32 किमी
कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्ण भागाचे उद्घाटन हे आणखी एक मोठे पाऊल आहे. आयआयटी कानपूर ते मोती झील हा संपूर्ण नऊ किलोमीटरमी लांबीचा मार्ग आहे. पंतप्रधान कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी करतील आणि आयआयटी मेट्रो स्टेशन ते गीता नगरपर्यंत मेट्रोने प्रवास करतील. कानपूरमधील मेट्रो रेल्वे प्रकल्पाची संपूर्ण लांबी 32 किमी आहे आणि या प्रकल्पासाठी 11 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते बिना-पंकी बहुउत्पादन पाईपलाईन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 356 किमी लांबीच्या या प्रकल्पाची क्षमता वार्षिक 3.45 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे. मध्य प्रदेशातील बिना रिफायनरीपासून कानपूरमधील पंकीपर्यंत पसरलेला या प्रकल्पासाठी 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. हा प्रकल्प बिना रिफायनरीमधून पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक करण्यास उपयोगी ठरेल.
Comments
Add Comment

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११