भास्कर जाधव 'नाचे'

मुंबई : कोकणात काही भागात नाचे आहेत, ते होळीच्या दिवशी पैसे दिले की नाचतात, त्यातला तो प्रकार विधानसभेत झाला असे म्हणत, राणे यांनी भास्कर जाधवांचा समाचार घेतला आहे. पंतप्रधानांवर कोण बोललं तर ऐकून घेणार नाही, नक्कल केली तर सेम उत्तर देऊ, आमच्यातही नकलाकार आहेत, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच भास्कर जाधव हे नाचे असल्याची टीका त्यांनी केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले की,सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. जिल्हा बँक निवडणुकीत आमच्याकडे सत्ता आल्यास त्यांनी केलेले गैरप्रकार उघड होतील. त्या भीतीतून नितेश राणे यांना गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका आमदारासाठी एवढी मोठी यंत्रणा कामी लावली आहे. एखाद्या दहशतवाद्यासाठी तरी यंत्रणा कामाला लावली होती का, असा मुद्दाही राणे यांनी उपस्थित केला आहे.. नितेश राणे हे कुठे आहेत, हे सांगायला मुर्ख वाटलो का, असेही नारायण राणे यांनी म्हटले. अनिल देशमुखही काही दिवस अज्ञातवासात होते, याची आठवणही राणे यांनी करून दिली.

आदित्य ठाकरे हे सभागृहात जात असताना नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायरीवर आंदोलन करताना मांजरीचा आवाज काढला होता. नितेश यांच्या कृतीला नारायण राणे यांनी अप्रत्यक्ष समर्थन केले. आदित्य ठाकरे आणि मांजरीचा काय संबंध? असा सवाल त्यांनी केला. मांजरीचा आवाज काढला तर राग का यावा? असा उलट सवालही त्यांनी केला. वाघाची मांजर कधी झाली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसंच कोण अजित पवार? त्यांना ओळखतही नसल्याचे म्हणत नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल केला. कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचा संदर्भ देऊ नका असेही राणे यांनी म्हटले. कोकणात पूर, नैसर्गिक वादळ आले तेव्हा अजित पवार कुठे होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Comments
Add Comment

Tuljabhavani VIP Darshan: तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन होणार महाग!

सोलापूर: शारदीय नवरात्रोत्सव (Navratri 2025) अवघ्या १० दिवसांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

हत्ती हटेना... वनविभाग पथक हतबल!

गोवा वन खात्याचे पथक सिंधुदुर्ग सीमेवर सतर्क ओंकार हत्ती आज दिवसभर नेतर्डे परिसरात ठाण मांडून असल्याने गोवा

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व