विशाल निकम ठरला “बिग बॉस मराठी सिझन 3” चा महाविजेता !

मुंबई : बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचा विजेता विशाल निकम ठरला आहे. बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नावं कोरत त्याने हा बहुमान पटकावला आहे. विशाल निकमला २० लाख इतकी धनराशी मिळाली आहे. तसंच बिग बॉसची मानाची ट्रॉफीही मिळाली. या रिऍलिटी शोमध्ये जय दुधाणेने  दुसरे स्थान पटकावले.


१०० दिवस, १७ सदस्य आणि एक ट्रॉफी ! बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात आला. सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच माहिती होते विजेता कोणी एकच असणार आहे. कार्यक्रमाच्या तिसर्‍या पर्वाला देखिल संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले. प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या भागापासून सुरुवात केली. प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगत गेली. मग ती टास्कविषयी असो, घरात होणार्‍या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्‍या नात्यांविषयीची असो. बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये सदस्य १०० दिवसं अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत राहिली. बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला. आणि शेवटी तो क्षण आला ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पहात होता, महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचा विजेता मिळाला. विशाल निकम ठरला बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचा विजेता तर जय दुधाणेने पटकावले दुसरे स्थान.
खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची त्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहेमीच चर्चेत राहिला. बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वामध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी त्याला मिळाली आणि आता तो या तिसर्‍या पर्वाचा विजेता ठरला.

Comments
Add Comment

बॉक्स ऑफिसवर दिसली झी स्टुडियोजच्या 'दशावतार' ची ताकद !

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेल्या

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी