पुणे शहरात पालिका उभारणार 500 ठिकाणी चार्जिंग स्टेशन

पुणे:  पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी महापालिका शहरातील प्रमुख रस्ते, उद्याने, महाविद्यालये अशा मोक्याच्या 500 ठिकाणी चार्जिंग स्टेशन आणि 200 ठिकाणी डॉकिंग स्टेशन्स उभारणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविली आहे.

'ई-बाईक रेटिंग' या उपक्रमांतर्गत नागरिकांना कमीत कमी दरामध्ये भाडेतत्त्वावर ई- बाईक उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या उपक्रमासाठी निवडल्या जाणाऱ्या कंपनीला मिळणाऱ्या उत्पन्नातही महापालिकेला वाटा मिळणार असून असा उपक्रम राबविणारे पुणे हे देशातील पहिले शहर असेल. पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढवून प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या गाइडलाइन्सनुसारच ही निविदा मागविण्यात आली आहे.

त्यानुसार 500 चौ. कि.मी. च्या शहरात ई-बाईकचे चार्जिंग स्टेशन आणि डॉकिंग स्टेशनसाठी मोक्याच्या 700 जागा निवडण्यात आल्या आहेत. नागरिकांना सहजासहजी ई-बाईक उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सरासरी प्रत्येक चौरस कि. मी. च्या परिसरात एक चार्जिंग स्टेशन असेल.

Comments
Add Comment

तोच फोटो ठरला शेवटची आठवण, एकाचवेळी झाला सात मित्रांचा मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंना

मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्याचा पुरावा आहे का ?

मुंबई : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण दिले

यंदाच्या दिवाळीत प्रदूषण नियंत्रण मंडळ १५८ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजणार

मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण

जातीयवादामुळे विद्यार्थ्याच्या नोकरीवर गदा?

महाविद्यालयावर आरोप; वंचित आघाडीचे आंदोलन पुणे  : पदवीधर झालेल्या प्रेम बिऱ्हाडे या दलित तरुणाला लंडनच्या

ऐन दिवाळीत 'काळाचा घाला'! नाशिकजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसमधून पडून २ युवकांचा दुर्दैवी अंत, १ गंभीर

नाशिक: मुंबईत पोटापाण्यासाठी गेलेल्या आणि दिवाळीच्या सणासाठी आपल्या कुटुंबीयांना भेटायला बिहारच्या दिशेने

प्रेम बिर्‍हाडेचा 'नोकरी'चा दावा खोटा? कॉलेजने उघड केले धक्कादायक सत्य!

पुणे: लंडनमध्ये आपली नोकरी गमावल्याचा भावनिक दावा करत समाजमाध्यमांवर प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या प्रेम