Wednesday, December 3, 2025

पुणे शहरात पालिका उभारणार 500 ठिकाणी चार्जिंग स्टेशन

पुणे शहरात पालिका उभारणार 500 ठिकाणी चार्जिंग स्टेशन

पुणे:  पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी महापालिका शहरातील प्रमुख रस्ते, उद्याने, महाविद्यालये अशा मोक्याच्या 500 ठिकाणी चार्जिंग स्टेशन आणि 200 ठिकाणी डॉकिंग स्टेशन्स उभारणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविली आहे. 'ई-बाईक रेटिंग' या उपक्रमांतर्गत नागरिकांना कमीत कमी दरामध्ये भाडेतत्त्वावर ई- बाईक उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या उपक्रमासाठी निवडल्या जाणाऱ्या कंपनीला मिळणाऱ्या उत्पन्नातही महापालिकेला वाटा मिळणार असून असा उपक्रम राबविणारे पुणे हे देशातील पहिले शहर असेल. पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढवून प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या गाइडलाइन्सनुसारच ही निविदा मागविण्यात आली आहे. त्यानुसार 500 चौ. कि.मी. च्या शहरात ई-बाईकचे चार्जिंग स्टेशन आणि डॉकिंग स्टेशनसाठी मोक्याच्या 700 जागा निवडण्यात आल्या आहेत. नागरिकांना सहजासहजी ई-बाईक उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सरासरी प्रत्येक चौरस कि. मी. च्या परिसरात एक चार्जिंग स्टेशन असेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >