लेफ्टनंट कर्नल विकास रायझादासह अनेकांना अटक

  121

मुंबई : आर्मी भरती प्रक्रियेचा पेपर लिक केल्याप्रकरणी सीबीआयनं मोठी कारवाई केलेय. सीबीआयनं लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा, हवालदार सुशांत नाहक, शिपाई अलोक कुमार आणि अलोक कुमारची पत्नी प्रियांका यांना अटक. 2019 मधे  सैन्याच्या क दर्जाच्या पदांची भरती करण्यासाठी घेण्यात आलेल्या 'परिक्षेची ॲन्सर की' या आरोपींकडे असल्याच समजल्यावर सी बी आय च्या एन्टी करप्शन विभागाकडून या आरोपींवर नजर ठेवण्यात आली आणि त्यांचे कॉल रेकॉर्डिं करण्यात आले.  त्यामधे या चौघांनी चाळीस ते पन्नास हजार रुपयांमध्ये आर्मीच्या 'क' दर्जाच्या पदांची 'ॲन्सर की' विकल्याच आढळून आलं आलं.


 यातील लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा पुण्यातील सैन्याच्या दक्षिण मुख्यालयात कार्यरत असून हवालदार सुशांत नाहक हा देखील दक्षिण मुख्यालयात तैनात आहे. तर शिपाई अलोक कुमार हा  कर्नल विकास रायझादाच्या ऑफीसमधे काम करतो. अलोक कुमारची बायको प्रियांका हीच्या मोबाईलवरून ॲन्सर की पाठवण्यात आल्याच सी बी आय च्या तपासात दिसून आलय.  त्याचबरोबर या चौघांचा सहभाग 2021 मधे झालेल्या सैन्य भरती घोटाळ्यात देखील असल्याच सी बी आयला आढळून आलय.

Comments
Add Comment

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर विक्रीत जुलैत 'इतकी' वाढ

मागील महिन्याच्या तुलनेत कंपनीच्या एकूण विक्रीत २०% वाढ झाली मुंबई: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर विक्रीत मागील

अदानी समुहाने 'या' अहवालावर व्यक्त केली नाराजी

प्रतिनिधी: अदानी समुहाने ब्ल्यूमबर्गच्या अहवालाला सपशेल नाकारल्याने ही अफवा होती का हा प्रश्न निर्माण होणे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच