Wednesday, April 30, 2025

महामुंबईमनोरंजनताज्या घडामोडी

सनी लिओनच्या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी

सनी लिओनच्या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone)च्या नवीन व्हिडीओ अल्बमवरुन चांगलाच वाद पेटला आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरेत (Mathura) साधुसंतांनी सनी लिओनीच्या नवीन व्हिडीओ अल्बमवर बंदी घालण्याची मागणी केली. साधूसंतांचं म्हणणं आहे की, अभिनेत्री सनी लिओनीनं "मधुबन में राधिका नाचे" (Madhuban Mein Radhika) या गाण्यावर अश्लील डान्स केला आहे. यामुळं धार्मिक भावना दुखावल्या असल्याचं साधूंचं मत आहे. याबाबत वृंदावनचे संत नवल गिरी महाराजांनी म्हटलं आहे की,  सरकारनं जर अभिनेत्री सनी लिओनीच्या विरोधात कारवाई केली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ असं नवलगिरी महाराजांनी म्हटलं आहे. व्हिडीओ अल्बमवर बंदी घालण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे.   संत नवल गिरी महाराजांनी म्हटलं आहे की, जोवर तो सीन काढून सनी माफी मागत नाही तोवर तिला भारतात राहायला देऊ नये.
Comments
Add Comment