मोठ्या कुटुंबाचं अस्सल गावाकडचं मराठी लग्नं!

  261

मुंबई:झी मराठीवरील 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत आणि आता ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. अनेक अडचणींचा सामना करत अखेर सीड आणि अदितीच्या लग्नाची वेळ समीप आली आहे. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी  देणारी ही मालिका आहे. लग्न हे नेहमी दोन माणसांच नाही तर दोन कुटुंबांचं असतं असं नेहमी म्हंटल जातं आणि देशमुख कुटुंब जे आपल्या नात्यांना आणि परंपरांना जपून आहेत, त्यांच्या गुळपोळीला होणारं लग्न म्हणजे एका सोहळ्यापेक्षा कमी नसणार यात शंकाच नाही.

सीड आणि अदितीच्या लग्नात सर्व पारंपरिक विधी संपन्न होणार असून प्रेक्षकांना मोठ्या कुटुंबाचं अस्सल गावाकडचं मराठी लग्नं पाहायला मिळणार आहे. हि प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असणार आहे. या पारंपरिक सोहळ्यात मुहूर्त मेढ, चुडा भरणे, सवाष्ण भोजन, मेहेंदी या सगळ्या विधी पार पडणार असून त्यांच्या दोघांच्या हळद समारंभाची हळद देखील घरी कुटली जाणार आहे. गावाकडे लग्न हे अगदी साग्रसंगीत आणि थाटामाटात होतं आणि हा सगळा थाट प्रेक्षकांना या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. हा लग्नसोहळा विशेष भाग प्रेक्षकांना  रविवार ,२६ ,डिसेंबर रोजी २ तासाच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तेव्हा सीड आणि अदितीच्या अस्सल गावाकडच्या लग्नाला यायला विसरू नकारविवार, २६, डिसेंबर दुपारी १ आणि संध्या. ७वा .
Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई