आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बंगळुरूतून अटक

मुंबई : शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूतला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने त्याला बंगळुरूमधून ताब्यात घेतले आहे. जयसिंग राजपूत हा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा फॅन असल्याचे सांगत आहे.


बंगळुरूहून अटक करण्यात आलेला आरोपी जयसिंग राजपूत (वय ३४) याने ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवला होता. त्या संदेशात त्याने 'सुशांत सिंह राजपूतला तु मारलं, आता नंबर तुझा' अशा आशयाचा संदेश राजपूतने आदित्य ठाकरे यांना केला होता. त्या संदेशाला ठाकरे यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर राजपूतने तीन फोनही केले. आदित्य ठाकरेंनी ते फोन उचलले होते. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसा संदेश त्याने आदित्य ठाकरेंना पाठवला होता. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीने ठाकरेंना अश्लील शब्दात शिवीगाळ देखील केली होती.


या प्रकरणी ठाकरे यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला. त्यावेळी आरोपी जयसिंग बंगळुरू येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी त्याला अटक केली.

Comments
Add Comment

कुलाबा कॉजवे परिसरातील ६७ अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले, महानगरपालिकेच्या ए विभागाकडून कारवाई

मुंबई (खास प्रतिनिधी): कुलाबा कॉजवे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात त्वरीत कारवाई करावी अन्यथा आंदोलन

संजय गांधी उद्यानातून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या प्रवेशद्वारावर घडणार वाघाचे दर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी): गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून

गोवंडी शताब्दी रुग्णालयासाठी तेरणा आणि सुरभी एज्युकेशन संस्थेत स्पर्धा

​मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेची चार रुग्णालये सार्वजनिक खासगी सहभाग तत्वावर चालवण्यास देण्याचा

बारावी परीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ

मुंबई  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च २०२६ मध्ये घेतल्या

स्थानिक विरोधामुळे मेट्रो कारशेडचा 'उत्तन-डोंगरी' प्लॅन रद्द!

७३३ कोटींच्या प्रकल्पाला एमएमआरडीएकडून मूठमाती; झाडे वाचवण्यासाठी नागरिकांची मोठी लढाई मुंबई: उत्तन-डोंगरी

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार नेते शशांक राव यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन महापालिका व सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी