महेश मांजरेकरांची चौकार, षटकाराची आतीषबाजी

मुंबई : झी टॅाकीजचा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सुवर्णदशक पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. मागील दहा वर्षांमधील कलाकारांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या सुवर्णदशक सोहळ्यातही सूत्रसंचालन हा मुद्दा लाइमलाईटमध्ये राहिला.. मांजरेकरांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत जोरदार फटकेबाजी करत सोहळयात रंगत आणली.


शाब्दिक फटकेबाजी करण्याची महेश मांजरेकरांची कला 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सुवर्णदशक सोहळयामध्ये पुन्हा एकदा पहायला मिळाली. पहिला तडाखा अर्थातच स्वप्नील-अमेय जोडीलाच बसला. 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सुवर्णदशक सोहळयाचं सूत्रसंचालन करताना एकमेकांवर कुरघोडी करू पाहणाऱ्या दोघांची ‘तू तू मैं मैं’ सुरू असताना प्रेक्षकांमधून मांजरेकरांचा आवाज आला आणि दोघंही काही क्षणासाठी अवाक झाले. त्यानंतर महेश मांजरेकरांच्या विंनतीला मान देत ते जे बोलतील ते दोघांनीही मान्य केलं. त्यानंतर काही वेळ मांजरेकरांनी मुख्य सूत्रसंचालनाचा लगाम स्वत:च्या हाती घेतला. यात त्यांनी वार्षिक बुलेटीन सादर केलंच, पण त्यासोबतच 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या पहिल्या पुरस्कार सोहळयापासूनच्या जुन्या आठवणींनाही सुखद उजाळा दिला.


 जुन्या व्हिडिओज मार्फ़त आठवणींचा पट याप्रसंगी उलगडला. चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळींची थट्टामस्करी आणि कौतुक करतानाच महेशसरांनी विनोदाच्या चौकार षटकाराची मनमुराद बॅटिंग केली. प्रसंगी कोणी दुखावलं गेलं असेल तर त्या कलाकारांप्रती महेशसरांनी दिलगीरी व्यक्त करत मनाचा मोठेपणा ही दाखवला.  


चित्रपटसृष्टीतील कोणतीच गोष्ट महेश मांजरेकरांपासून लपून राहत नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाची इत्थंभूत माहिती त्यांच्याकड़े असते. वार्षिक बुलेटीनमध्ये पुन्हा एकदा कलाकार, गायक, संगीतकारांचा यथेच्छ समाचार घेत मांजरेकरांनी आपल्या अनोख्या शैलीत 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?'सुवर्णदशक सोहळयामध्ये रंग भरले. मंचावर हे सर्व सुरू असताना समोर बसलेले सिनेसृष्टीतील दिग्गज मनसोक्त आनंद घेत होते आणि स्वत:ची थट्टा-मस्करी केली जाऊनही त्याचा मनमुराद आनंदही लुटत होते. हा पुरस्कार सोहळा महेश मांजरेकरांच्या खुमासदार निवेदनाने अधिक रंगतदार होतो. यंदाही हा सोहळा अनेक आकर्षक कलाविष्कारांनी चांगलाच रंगला.महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सुवर्णदशक सोहळा रविवार २६ डिसेंबरला सायंकाळी ६.०० वा. झी टॅाकीजवर प्रसारित होणार आहे.





Comments
Add Comment

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी