कंगना राणावत खार पोलीस ठाण्यात; दीड तास नोंदवला जबाब

मुंबई :दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका केल्यासंदर्भात संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी अभिनेत्री कंगना राणावतने खार पोलीस ठाण्यात गुरुवारी हजेरी लावली. दीड तास तिचा जबाब नोंदवण्यात आला.



काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करताना आंदोलनाचा संबंध एका फुटीरतावादी संघटनेशी असल्याचे सांगितले. त्यानंतर शीख संघटनांनी मागील महिन्यात खार पोलीस ठाण्यात कंगना विरोधात तक्रार दाखल केली होती.



दिल्लीच्या सीमेवर झालेले शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन आहे, असं कंगनाने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनात पंजाबमधील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. कंगनाच्या या टिप्पणीनंतर शीख संघटनांकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. कंगनाच्या या टिप्पणीनंतर शीख संघटनांकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.



शीख संघटनेने केलेल्या तक्रारीवर खार पोलिसांनी कंगनाविरोधात एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरविरोधात कंगनाने या हायकोर्टात धाव घेतली होती. पोलिसांनी कंगनाविरोधात २५ जानेवारी २०२२ पर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे म्हटले होते.

Comments
Add Comment

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

डॉक्टर आज संपावर!

मुंबई : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील