तुम्ही घेतलेली सीलबंद पाण्याची बाटली ओरीजनल आहे का?

ठाणे : आयएसआय मार्कचा गैरवापर करून सीलबंद पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची (reeha water bottle) मोठ्या प्रमाणावर निर्मिती करुन मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खुलेआम विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS), मुंबई यांनी IS (भारतीय मानक) 14543 नुसार 'सीलबंद पेयजल बाटलीवरील' ISI मार्कचा गैरवापर तपासण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे अंमलबजावणी शोध घेतला आणि जप्तीची कारवाई केली.


मे. अम्मार वॉटर (2298, खोली क्रमांक 3, बस्ती कंपाऊंड, शांतीनगर रोड, नागाव II, भिवंडी-421302, ठाणे) च्या आवारात छापा टाकताना ही संस्था वैध परवान्याशिवाय 'रीहा' ब्रँडसह भिन्न परवाना क्रमांक - CM/L.No-7200168205 वापरून सीलबंद केलेले पेयजल भरून BIS प्रमाणन चिन्हाचा (म्हणजे ISI मार्क) गैरवापर करत असल्याचे आढळून आले. छाप्यादरम्यान IS 14543:2016 नुसार सुमारे 6,408 एक लिटर PET (पॉलीथिलीन टेरेफ्थालेट) बाटल्या आणि अर्ध्या लिटरच्या 8,472 PET बाटल्या जप्त करण्यात आल्या. बीआयएस मुंबईचे अधिकारी निशिकांत सिंग, क श्रेणीचे वैज्ञानिक आणि ब श्रेणीचे वैज्ञानिक विवेकवर्धन रेड्डी, यांनी शोध आणि जप्तीची कारवाई केली.


BIS मानक चिन्हाचा गैरवापर केल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा BIS कायदा 2016 नुसार किमान 2,00,000 रुपये दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. गुन्ह्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली जात आहे.


बनावट आयएसआय चिन्हांकित उत्पादने तयार करून ग्राहकांना मोठ्या नफ्यासाठी विकली जात असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. म्हणून, सर्वांनी बीआयएस संकेतस्थळ http://www.bis.gov.in ला भेट देऊन खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावरील ISI चिन्हाचा खरेपणा तपासण्याची विनंती केली जात आहे.


गैरवापर आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन


नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी कोणत्याही उत्पादनावर ISI मार्कचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास ते प्रमुख, MUBO-II, वेस्टर्न रीजनल ऑफिस, BIS, Manakalaya, E9, मरोळ टेलिफोन एक्सचेंजच्या मागे, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400093 यांना कळवावे. अशा तक्रारी hmubo2@bis.gov.in या पत्त्यावर ई-मेलद्वारे देखील केल्या जाऊ शकतात. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.

Comments
Add Comment

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो

मदर डेअरीचे टेट्रा पॅक दूध आजपासून प्रति लिटर २ रुपयांनी स्वस्त

मुंबई: मदर डेअरीने आपल्या युएचटी दूधाच्या (टेट्रा पॅक) किमतींमध्ये २ रुपयांची कपात करण्याची घोषणा आज, मंगळवारी

मुंबई मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद, एमएमआरडीएचा निर्णय

मुंबई : चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांच्या