भारताचा 'पेबल्स' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

मुंबई : पी. एस. विनोथराज यांचा 'पेबल्स' चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ऑस्करच्या पुढील फेरीमध्ये हा चित्रपट प्रवेश मिळवू शकला नाही. त्यामुळे या चित्रपटाला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. इंटरनॅशनल फिचर फिल्म श्रेणीमध्ये आता अंतिम 15 चित्रपटांची नावं घोषित झाली आहेत. बुधवारी अॅकेडमीच्यावतीनं या चित्रपटांची नावं घोषित करण्यात आली होती. पेबल्सच्या निर्मात्यांनी मात्र ऑस्करवर नाराजी व्यक्त केली आहे.



निर्माता विघ्नेश शिवन यांनी व्टिट करुन नाराजी जाहीर केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, आमचा चित्रपट का सिलेक्ट झाला नाही याचा आम्हाला आता विचार करावा लागणार आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे आमची निवड झाली नाही हे जाणून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. मात्र जे यश मिळालं ते देखील कमी नाही. हे आवर्जुन सांगावसं वाटतं. आमची निवड झाली असती तर तो आणखी एक बहुमान ठरला असता असं वाटतं. मात्र ते काही शक्य झालं नाही. त्यामुळे थोडी निराशा वाट्याला आली आहे. अशा शब्दांत निर्मात्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Comments
Add Comment

Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी

Supreme Court On UGC: सर्वोच्च न्यायालयाकडून यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या  म्हणजेच यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती देण्यात आली

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत 'महाराष्ट्र पॅटर्न'चे सर्वोच्च न्यायालयाने केले कौतुक

अन्य राज्यांच्या उपाययोजनांवर ओढले ताशेरे नवी दिल्ली :देशातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांना

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर