Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी केंद्राने कंबर कसली आहे. नवी दिल्लीतील भव्य 'भारत मंडपम' येथे आयोजित 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये शुक्रवारी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत या तंत्रज्ञान क्रांतीचा आढावा घेतला. तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत जागतिक नकाशावर कसा आघाडीवर राहील, यावर या समिटमध्ये विशेष मंथन करण्यात आले.



या शिखर परिषदेविषयी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी मोदी सरकारच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आज तंत्रज्ञान क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. ही समिट म्हणजे केवळ एक चर्चासत्र नसून, भविष्यातील भारताचा तांत्रिक नकाशा (रोडमॅप) आहे. एआयच्या माध्यमातून सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणे आणि भारताला जागतिक एआय हब बनवणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे."


या परिषदेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संबोधित केले. "डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारताने आधीच मजबूत पाया तयार केला आहे. आता 'इंडिया एआय समिट'च्या माध्यमातून आपण जगाला दिशा देण्याचे काम करत आहोत," असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. या समिटमध्ये तंत्रज्ञानासोबतच एआयच्या नैतिक वापरासावरही सखोल चर्चा झाली. डेटा सुरक्षा, सायबर सुरक्षितता आणि तरुणांच्या कौशल्य विकासासाठी एआयचा वापर कसा करता येईल, यावर विविध देशांच्या प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. मंत्री नितेश राणे यांनी यावेळी विविध देशांच्या तांत्रिक धोरणांचा आणि भविष्यातील संधींचा सखोल आढावा घेतला.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी