लुधियाना कोर्टात स्फोट; २ ठार, ४ जखमी

चंदीगड : लुधियाना जिल्हा न्यायालय परिसरात स्फोट (explosion in ludhiana) झाला आहे. या स्फोटात २ जण ठार तर ४ जण जखमी झाले आहेत. वकिलांच्या संपामुळे न्यायालय परिसरात गर्दी नव्हती. त्यामुळे मोठी हानी टाळता आली. पण स्फोटात न्यायालयाच्या इमारतीचीही मोठी हानी झाली आहे. या स्फोटातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


लुधियाना जिल्हा न्यायालयाच्या आवारात दुसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाला. या घटनेतील दोषींना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी म्हटले आहे.


स्फोट इतका जोरदार होता की आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या. हा घातपात होता का? याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. हा स्फोट कोणी आणि का केला, याची माहिती मिळालेली नाही.


हा स्फोट सिलिंडरमुळे झाला की आणखी कशामुळे, हे अद्याप समजू शकलेले नाही. प्रशासनाने प्राथमिक तपास सुरू केला आहे. ही घटना घडली तेव्हा न्यायालयाच्या आवारात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. लुधियानाच्या जुन्या कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट कटाचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.


आम्ही तपास करत आहोत. या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. आम्ही फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आहे, असे लुधियानाचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

सोनिया गांधी रुग्णालयात

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

Hydrabad Crime : अमेरिकेत हैदराबादच्या लेकीची निर्घृण हत्या; संशयित माजी रूममेट भारतात पळाला, तामिळनाडूत अटक

हैदराबाद : अमेरिकेतील मेरीलँड राज्यात डेटा आणि स्ट्रॅटेजी ॲनालिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या निकिता गोडिशला (वय

चोरीसाठी शिरला, पण नशीब फिरलं! दोन दिवस भिंतीत अडकलेला चोर, VIDEO व्हायरल

चोरीसाठी चोर कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा काही अंदाज नाही. मात्र राजस्थानमध्ये चोरा सोबत असं काही घडलं की त्याला

लाल किल्ल्याजवळील स्फोटप्रकरणात एनआयएचा तपास वेगात; नऊ आरोपी अटकेत

नवी दिल्ली : लाल किल्ला स्फोट प्रकरणातील आरोपी यासिर अहमद दार याची कोठडी १६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’ तटरक्षक दलाच्या ताफ्यात

जहाज आधुनिक अग्निशमन क्षमतांनी सुसज्ज; कोचीत राहणार तैनात पणजी : जहाजबांधणी आणि सागरी क्षमता विकासात

उमर खालिदला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : दिल्लीत २०२०च्या दंगलींशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय